80 दशलक्ष वापरकर्त्यांची पसंती असणारा ब्रेव्ह ब्राऊझर आणि शोध इंजिन एक जास्त सुरक्षित आणि जास्त खासगी स्वरूपाचा वेब अनुभव देतो. बिल्ट-इन ॲडब्लॉक आणि VPN च्या साहाय्याने, ब्रेव्ह मुळातूनच ट्रॅकर्स आणि जाहिराती ब्लॉक करतो आणि तुम्ही निवांतपणे वेब सर्फ करू शकता.
🤖 नवीन : AI मदतनीस
ब्रेव्हने सुरु केला आहे ब्रेव्ह लिओ. लिओ हा या ब्राऊझरमधील एक विनामूल्य AI मदतनीस आहे. प्रश्न विचारा, उत्तरे मिळवा, भाषांतरे करा आणि आणखी बरेच काही.
🔎 ब्रेव्ह शोध
ब्रेव्ह शोध हे जगातील सर्वांत परिपूर्ण, स्वतंत्र, खासगी शोध इंजिन आहे.
🙈 खासगी ब्राऊझिंग
ब्राऊझ करा आणि वेब सर्फ करा सुरक्षितपणे आणि खासगीपणे ब्रेव्ह सोबत. ब्रेव्ह तुमच्या ऑनलाईन गोपनीयतेबाबत हयगय करत नाही.
🚀 झटपट ब्राऊझ करा
ब्रेव्ह आहे एक वेगवान वेब ब्राऊझर! ब्रेव्ह पान लोड होण्यासाठी लागणारा वेळ कमी करतो, वेब ब्राऊझरची कामगिरी सुधारतो आणि मालवेअर असणाऱ्या जाहिराती ब्लॉक करतो.
🔒गोपनीयतेचे संरक्षण
आघाडीच्या गोपनीय आणि सुरक्षा वैशिष्ट्यांसह संरक्षित राहा, उदाहरणार्थ HTTPS सगळीकडे (एन्क्रिप्ट केलेला डेटा ट्रॅफिक), स्क्रिप्ट ब्लॉकिंग, कूकी ब्लॉकिंग, आणि खासगी इन्कॉग्निटो टॅब्स. ऑनलाईन तुमचा कोणीही माग ठेवू नये हा तुमचा कायदेशीर अधिकार आहे, आणि तो राखण्यासाठी जागतिक गोपनीयता नियंत्रण आपोआप सक्रिय केलेले असते.
🏆ब्रेव्ह बक्षिसे
तुमच्या जुन्या ब्राऊझरवर तुम्ही जाहिराती बघून इंटरनेट ब्राऊझ करण्याची भरपाई करत होतात. आता, ब्रेव्ह तुमचे नव्या इंटरनेटवर स्वागत करत आहे. जिथे तुमच्या वेळेला किंमत असते, तुमची वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवली जाते, आणि तुम्ही तुमचे लक्ष दिलेत तर चक्क त्यासाठी तुम्हाला भरपाई मिळते.
ब्रेव्हविषयी
एक सुरक्षित, वेगवान आणि खासगी ब्राऊझर उभारून तुमच्या ऑनलाईन गोपनीयतेचे रक्षण करणे, व त्याच वेळी काँटेंट निर्मात्यांना जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न वाढवणे हे आमचे ध्येय आहे. वापरकर्त्यांना आणि प्रकाशकांना फायद्याचा सौदा मिळवून देण्यासाठी मायक्रोपेमेंट्सच्या साहाय्याने आणि एका नव्या, उत्पन्न वाटून घेण्यासाठीच्या उपाययोजनेसह ऑनलाईन परिसंस्थेचा कायापालट करणे हे ब्रेव्हचे लक्ष्य आहे.
ब्रेव्ह वेब ब्राऊझरविषयी आणखी जाणून घेण्यासाठी, www.brave.com वर जा.
प्रश्न/मदत?
आमच्याशी http://brave.com/msupport येथे संपर्क साधा. आम्हाला तुमचे म्हणणे ऐकायला आवडते.
वापरासंदर्भातील नियम : https://brave.com/terms-of-use/
गोपनीयता धोरण : https://brave.com/privacy/
टीप : अँड्रॉइड 7 आणि त्यावरील अद्यतनांवर काम करतो.
आजच अँड्रॉइडसाठीचे सर्वोत्तम खासगी वेब ब्राऊझर ॲप डाऊनलोड करा! आत्मविश्वासाने आणि सुरक्षितपणे इंटरनेट ब्राऊझ करा.